माळशेज घाटात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची दूरवस्था   

शिवनेरी, (वार्ताहर) : कल्याण-माळशेज घाट-बनकर फाटा-ओतूर-आळेफाटा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, किल्ले शिवनेरी, भीमाशंकर, ओझर, लेण्याद्री आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी नागरिक, पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत पर्यटक, स्थानिक नागरिक, आम्ही नगरकर प्रतिष्ठान मुंबई रहिवासी संघ, स्फुर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग तांगडकर, सचिव शिल्पा तांगडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला एक निवेदन दिले आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत.राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित सुरू न केल्यास १ मे महाराष्ट्र दिन आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशन वतीने या परिसरात रास्ता रोखा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 

Related Articles